दारूसेवनाच्या किमान वयोमर्यादा कायद्यासंदर्भात...
सध्या आमरण उपोषणांचा सीझन असल्यामुळे महाराष्ट्रातील तळीरामांनी देखील तोच मार्ग अवलंबायचे ठरवीले आहे. राज्यसरकाराच्या विचाराधीन असलेल्या दारूसेवनाच्या किमान वयासंदर्भातल्या कायद्याच्या निषेधार्थ हुतात्मा स्मारकाजवळ, गटारी अमावस्येच्या मुहुर्तावर उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे. कळकळीचा, ज्येष्ठ दारुडा आणि सत्तरीच्या दशकातला गरम धरम उर्फ़ धरमेंद्र तरुणांचे नेतृत्व करणार आहे.
वयाच्या पंचवीस वर्षांपर्यंत दारू पिऊ न देणारा हा कायदा लोकशाही तत्त्वांची पायमल्ली करीत आहे. तरूण वर्गात त्यामुळे प्रचंड असंतोष पसरलेला आहे. दारू पिण्याच्या व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी सहन न झाल्याने सिद्धार्थ मल्ल्याने आंदोलनाला पाठींबा जाहीर केल्याने आंदोलनांना आवश्यक असणारे ग्लॅमरही लाभणार आहे.
ज्या तरुणांना हुतात्मा स्मारकापाशी येणे शक्य नाही त्यांनी आपापल्या गावातच स्थानिक हातभट्ट्या व बार येथे जमुन आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ह्या अमानुष कायद्याचा फेरविचार करण्याबरोबरच सरकारचा दारूबंदी विभागच बंद करावा अशी कळकळीची मागणी करण्यात येणार आहे. फेसबुक व मेणबत्त्यांव्यतिरीक्त आणखी काय काय करता येऊ शकेल ह्याबाबत समितीचा सध्या विचार सुरु असुन हे आंदोलन यशस्वीरित्या पार पडेल असा आत्मविश्वास सगळ्यांनाच आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)


0 comments:
Post a Comment