Monday, January 24, 2011
जगाला निर्भीडपणे सामोरी जाणारी ती तशी कणखर आहे. best foot forward वगैरे strategy ती कधी वापरत नाही. तिला जसं वाटेल तशी ती जगापुढे येणार. दुसर्याची भूमिका समजून घेण्याची विलक्षण क्षमता तिच्यात आहे. भले ती भूमिका तिच्या भूमिकेशी विसंगत का असेना. तुझी भूमिका तुझ्यापाशी आणि माझी माझ्यापाशी असं वागणं. एरवी अशी सुसंगत असणारी ती तशी बर्याचदा स्वतःबद्द्ल मात्र ह्ळवी होते. स्वतःतल्या द्वंद्वांना मग तत्त्वज्ञानाची जोड लावते. पण असा आतल्या आत विचार केल्यानी मग तिचे कयास चुकीचे लागायला लागतात मग कधी ज्वालामुखीचा उद्रेक आणि मग दीर्घ शांतता तर कधी उपरती आणि नंतर सारवासारव. आणि ह्या सगाळ्यात कायम असतो तो तिचा खरेपणा. आणि नेमकं हेच मला भावणारं. तिला उमजलय की नाही हे माहित नाही पण तिनं तिच्या आसपासच्या आमच्या आयुष्यांवर कायमची मोहोर उमटवलीय हे नक्की आणि तिनं ह्या बाबत तरी शंका घ्यायला नकोय...
Subscribe to:
Post Comments (Atom)


0 comments:
Post a Comment