Monday, January 07, 2008

अक्षरश: स्वत:च्या अभिरुचीचं प्रतिबींब असं एका designer मित्राचं वेगळं आणि अतीसुंदर घर. सगळ्याच वेगळेपणात एक वस्तू अगदी जवळची वाटते ती म्हणजे kitchen cabinet मध्ये लपलेला दळणाचा मोठ्ठा डबा.

स्वत:चं घरटं जेव्हा थाटलं तेव्हा साखरेच्या सुबकशा नवीन बरणीत मात्र किल्वरच्या आकाराचा तो बुटका चमचाच ठेवावासा वाटतो. food processor, १०-१२ सुर्‍यांचा तो लाकडी ठोकळा असूनसुध्दा एक विळी विकत घ्यावीशी वाटते. ग़ुबगुबीत गादीवरही आईच्या साडीच्या गोधडीची आठवण येते.

प्रतिष्ठीत उद्दोगपतीच्या ऑफ़िसमध्ये मीटींग असली की त्याच्या आवडीचा चहा आणि वडा-पाव असतो म्हणुन तो मला आवडूनच जातो. एका बड्या हस्तीच्या एरवीच्या अलिशान घरात असलेल्या जुन्याच mosiac tiles आणि 'वैष्णव जन तो' ची मंद धून ऐकून आदर द्विगुणीत होतो.

परदेशात असताना बाकी रंगवलेल्या तोंडाच्या आणि वेगळ्या वेगळ्या केसांच्या तर्‍हा असलेल्या मुलींमध्येच एक वेणी घातलेली आणि दिसताच साधी वाटणारी मुलगी बघुन तिला मैत्रीण करावंसं वाटतं. मध्यरात्र उलटून पार्टीतून परतताना 'तशाही' अवस्थेत सिद्धीविनायकाला हात जोडणारा colleague सगळ्यांपेक्षा वेगळा वाटतो.

मूळचे चिरंतन मध्यमवर्गीय संस्कार म्हणजे हेच का?

3 comments:

Tulip said...

वेलकम बॅक प्रसाद! खूप छान वाटलं तुझं नवं पोस्ट पाहून. गायबच होतास वर्षभर!

मस्तं लिहिलं आहेस अगदी. आणि माझ्यातही असे अनेक मध्यमवर्गीय संस्कार ठासून भरलेले असल्याने पटलंही :D . गंमत म्हणजे वीज, अन्नं, पाणी फुकट न घालवणे आणि ते घालवलेले न आवडणे ह्यांना मात्र मी म.म. संस्कार समजत होते तर ते मात्र आता पर्यावरणाच्या दृष्टीतून सध्या इथे ब्राऊनी पॉइन्ट्स मिळवणारे ठरत आहेत))).

जास्त गॅप न घेता लिहित रहा.

Prasad said...

Nakki lihin. While in Oslo I have ample time and had enough to write about. Each day was a new experience.

Now am back to Big Bad Bombay and the life is a race..I am on the run from the time I get up till the time I sleep...sleep for 6 hours and then again get ready for the race ... I miss Oslo :(

Aadi said...

बर्‍याच दिवसांनी रे!
इकडे काही वेगळी अवस्था नाही... IKEA मध्ये दगडी खलबत्ता दिसल्यावर मला काय बरं वाटलं सांगू.. अगदी तु म्हणतोस तसा इंग्रजी ललनांमध्ये एखादी पाचवारी नेसलेली दिसली कि जसं बरं वाटतं तसंच! :)
छान..