Thursday, October 19, 2006

नन्नाचा पाढा

आताशा थंडीचा तडाखा चांगलाच जाणवू लागलाय. बर्फ पडायला जरी अजून अवकाश असला तरी कोट-कानटोपी शिवाय बाहेर पडता येत नाही. आज ऑफिस मधे शिरल्या बरोबर लक्षात आलं की floor heater overnight चालू ठेवायला सुरवात करायला हवी. घरातली जमीन लाकडाची आहे हे एक बरंच झालं.

बटण चालू करणार तोच लक्षात आलं की कोण्या असामान्य रंगार्‍यानं मस्तपैकी स्विचबोर्डावरुन oil paint असा काही मारलाय की बटण चालू होणं केवळ अशक्य! वैतागच आला. बरं असंही नाही की मारली गाडीवर टांग गेलो कोपर्‍यावरच्या मजूर अड्ड्यावर आणला एक गडी झालं झटक्यात काम. काहीतरी खुडबुड खुडबुड करुन झाला एकदाचा तो heater सुरु आणि दमुन मी खुर्चीत बसलो आणि आमच्या ऑफिसमधल्या शिपायाची इतकी आठवण आली. तो असता तर ह्या सगळ्याचा चार्ज त्यानीच घेतला असता. वर नंतर गरम कॉफीचा आयता कपही बसल्या जागी मिळाला असता...

कॉफीची आठवण झाली म्हणून उठून percolator चालू केला आणि कपाट उघडून बघतो तो काय, साखर इल्ले! बरं असही नाही की लावलाय कोपर्‍यावरच्या वाण्याला फोन आणि आलाय त्याचा पोर्‍या सायकल हाणत पटकन. बाकीच्यांना काही सोयरसुतक नाही कारण ते पिणार black coffee. दिवसभरातल्या बाकी कॉफ्या जरी black चालत असल्या तरी ही पहिली कॉफी मला आपली दुध-साखरेची लागते. मग काय पुन्हा एकदा कोट-टोपीचा जामानीमा केला आणि पडलो बाहेर...

रोज अगदी हटकून आमच्या कामवाल्या बाईंची आठवण येते. स्वैपाक आपणच, धूणं-भांडी, केर-वारे आपणच. सगळं आहे. washing machine, drier, microwave पण करावं तर लागतच ना!

एक दिवस मजाच झाली. बर्फ पडायला लागण्याआधीच बूट घ्यायला म्हणून दुकानात शिरलो, बराच वेळ झाला तरी माझ्याकडे कुणीच येईना. या साहेब, या साहेब नाही. थंडा गरम नाही. बेंचखालून फर्रकन पायाचं माप घ्यायचा तो स्टॅंड ओढणं नाही. पटवा पटवी नाही. माळ्यावरच्या माणसाशी अगम्य भाषेत बोलणं नाही. आकाशातनं पडल्यासारखे त्या भोकातून पडणारे आपल्या मापाचे बूट नाहीत. कुणी तुझा पाय हातात घेउन बूट घालून देणारे? स्वप्नात आहेस का काय? भानावर येउन मी आवडलेला बूट हातात घेतला, बाजूला ठेवलेली जीभ मदतीला घेउन घालून बघितला. स्वतःच स्वतःला अभिप्राय दिला आणि माझी मिळमिळीत खरेदी उरकली...

जागा वेगळ्या पण परिस्थिती अशीच. पोष्टात जा की बॅंकेत एक तर सगळं automatic. माणसाच्या मदतीची गरज पडलीच तर मशीनमधून नंबराच तिकीट काढायचं आणि indicator कडे बघत तिष्ठत उभं राहायचं.

संध्याकाळी घरी येताना बसला गर्दी नाही, अंगावर खेकसणारा कंडक्टर नाही. कोपर्‍यावर ओळखीचं हसणारा चांभार नाही...काही मजाच नाही...

11 comments:

yogesh said...

hmm... :)

Parag said...

this is not fair to marathi illiterate people like me! :(

Tulip said...

सहीये पोस्ट:)) एकदम पटलं .. विशेषत: बुट खरेदी :)..

Gayatri said...

बेष्ट! 'आकाशातल्या भोकातनं पडल्यासारखे बूट :))

Prasad said...

Thanks Yogesh, Tulip and Gayatri..

Tumcha tighanchahi likhan manapasun aavadlay...tumhala na vichartach tumche blogs 'link' kartoy..I hope you don't mind me doing that...

Tulip said...

my pleasure prasad! fakt aata tu vachalelya saglya posts var avarjun jya comments dilya ahes tya baddal tujhe abhar ekdam ch ani ithech manun takte:D

Aadi said...

एकदम सही पोस्ट!
लोकसंख्येची समस्या कधी कधी वरदान बनून येते ती अशी :)
आपल्याकडच्या social life चे फायदे पण आहेत आणि तोटे पण! शेजारच्या काकू जितक्या लाडाने तुपाची धार घातलेली पुरणपोळी आणून देतात तितक्याच हक्काने माझी portraits ची वही माझ्या बिनदेखत उघडून "शी.. ही असली कसली चित्रं काढतो तुमचा मुलगा" असे पण आईला सुनावतात
not encroaching on someone's personal space हा fundaa काही आपल्याकडे लोकांना झेपत नाही :)

Prasad said...

Aadi,

Perfect. You got my point!

Anonymous said...

sahich ki kiti chan nahi nahi nahi sagal nahich

Anonymous said...

Well this is fun! I understand absolutely NOTHING! :)

-Kari

स्नेहा said...

hmm chanach...chitra somor ubh rahat tumachya nanna chya padhyaach...