Saturday, October 07, 2006

स्फुट

मुल लहान असतं तेव्हा आई भोवताली असतं. अगदी आईला सोडत नाही. जरा रांगू लागलं की ते उंबर्‍यापर्यंत जातं आणि परत येतं. जरा चालायला लागलं की अंगणात फाटकापर्यंत जातं आणि परत येतं. आतापर्यंत त्याला आईच माहित होती पण आता मात्र त्याला आई, घर आणि अंगण माहित झालयं. मग पुढे पुढे आई, घर, अंगण आणि शाळा. त्याहीपुढे आई, घर, अंगण, शाळा, कॉलेज आणि ऑफिस...

कधीकधी मग त्याला आई, घर, अंगण, शाळा, कॉलेज, ऑफिस... आणि नॉर्वेही माहिती होतं. पण म्हणुन काय ते आई, घर... सगळं विसरतं? शक्यच नाही. उलट प्रकर्षानी आठवतं.

त्याला माहित असतं की ते सगळं आपलच तर आहे. ते कुणीसुध्दा हिरावून घेऊच शकणार नाही. आणि म्हणूनच ते निर्धास्त असतं. परतायचं तर असतच, मग काळजी कसली?

प्रसाद

7 comments:

ranjeet said...

Kay sundar lihitos re!!! Wow! Just amazing!!

The Scorpion said...

Good! V Good!! Chhotasa Lekh pan Ati Sunder aahe.
Good work Keep it up

Anwar

Anagha said...

Hey... I love the way you write. Aksharsha dolyan samor ghar aani mul ubhe hote :)

Prasad said...

Hey Ranjeet, Anwar and Anagha

Thnk you for your comments :-))

prasad

Ashu said...

Ju aathvani tajya jhalya. Great

Aadi said...

खूप छान लिहिलेयस. ललित लिहीण्याचा प्रयत्न केलायस का कधी?

Prasad said...

Hi Aadi..

Nahi lalit vagaire nahi lihila kadhi. gammat mhanje ajun eka mitrani mala hach prashna vicharla. sarcastically mhantay ka kay?