Thursday, September 14, 2006

ऑस्लोमधील कुत्री.

आता तुम्ही म्हणाल की कुत्री हा काय लिखाणाचा विषय आहे, पण आहे, ऑस्लोमधील कुत्री हा लिखाणाचा विषय नक्कीच आहे.

एवढी नशीबवान कुत्री मी कधीच पाहिलेली नाहियेत. एकजात सगळी अगदी गुबगुबीत तरी किंवा उमदी, दमदार तरी. लूत भरलेली, अशक्त, पांगळी अशी कुत्री कुठेही दिसली नाहीत. एक तर मोकट कुत्री एथे नावला सुध्दा नाहित. सगळीच पाळीव आणि एकेकाची ऐट तरी काय. त्यांच्या गळ्यातले ते फ़ॅशनेबल पट्टे काय, त्यांचे ते ओढ्ताण होणारे लीषेस काय. कुणाकुणाला तर पायात पायताणं सुध्दा घातलेली बघितली. आणि हे बेटे मालकांबरोबर (किंवा मालकीणींबरोबर!) अगदी विनासायास हिंडत असतात. बसमधे सुध्दा. छोट्या पिलांना बाळासारखं कडेवर काय घेतात, त्यांचे मुके काय घेतात.

कुत्र्यासारखी कुत्री पण कधी कुणाकडे बघुन भुंकणं नाही की कधी कुणाच्या मागे लागणं नाही. कधी एखाद्या सायकल स्कूटरस्वाराला घाबरवून पाडणं नाही. अनोळखी माणूस बघूनसुध्दा वेड्यासारखं उगाच शेपुट हलवणं नाही. नको त्या जागी हुंगणं सुध्दा नाही! एवढच कशाला आपल्या इतर मित्र किंवा मैत्रिणींकडे बघून वेडंपीसंही होत नहीत. मालक ( हो किंवा मा... ण) दुकानात गेलेला असेल तर ही बाहेर बांधल्या जागी शहाण्या बाळासारखी बसून राहतात. कधी कधी मला भिती वाटते की हि कुत्रीसुध्दा झेब्रा क्रॉसिंगवरून वगैरे रस्ते क्रॉस करतात की काय आता...

आणि प्रकार तरी किती. आपल्याकडे मी त्या सॉफ़्ट टॉइजमधे अनेक प्रकारची कुत्री बघितलीयेत. मला आपलं नेहमी वाटायचं की अशी कुत्री कुठे असतात. मी आपलं समजायचो की लहान मुलांना गंमत वाटावी म्हणून बनवत असावेत. पण नाही, अशी कुत्री असतात. मी पाहतोय एथे. अगदी खेळण्यातली वाटतात पण खरी असतात!

पण एथली लोकं फ़ार करतात हो कुत्र्यांचं. फिरायला घेऊन जाताना शी केली (म्हणजे कुत्र्यांनी हां) तर वाकून प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून पुढच्या केराच्या कुंडीत टाकतात. ट्रेनींग वगैरे तर देतच असणार.
एक मात्र आहे, कुत्र्यासारखं जगणं किंवा कुत्ते की मौत मरना असले वाक्प्रचार इथल्या भाषेत नसतीलच!

14 September 2006

7 comments:

Shailesh S. Khandekar said...

प्रसाद,
लेख आवडला. मराठी अनुदिनीविश्वात स्वागत आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

Manjiri said...

मस्त जमलाय लेख! खरंच परदेशात कुत्र्यांचे लाड फार!
चलो! every dog has his days! सध्या त्यांचे आहेत!
नव्या लेखनासाठी शुभेच्छा!
एक suggestion, you might want to reduce the length of the blogname, that would make the left and right columns of the blog to be alligned. But you will have to start a new blog for that :(

Prasad said...

Hey Manjiri and Shailesh,
Thank you both for those nice words. I found your individual blogs interesting too! Happy bloggering..cheers!

Bhushan said...

Oh Prasad,
I felt as if Im reading P. L . Deshpande....
too good yaar!
Mastach Lihilays....and I just experinced this in Holland....so could relate to everything you have written...Actually I was touhing all the cute dogs coming our way and Kunal and Alan would get pissed off because they are scared of dogs, but later even they realised these dogs are totally harmless...
Will wait for more creative writing from you...

Keep it up!
Bhushan.

P.S. by the way asa Marathi font kuthun Milala??

Prasad said...

Hey Bhushan,

Thank you!

yogesh said...

sahi aahe :))

Prasad said...

Thanks Yogesh...